गॅसच्या भडक्यात चौघे जखमी

गॅसच्या भडक्यात चौघे जखमी
USER

पेठ | प्रतिनिधी Peth

पेठ तालुक्यातील peth Taluka म्हसगण Mhasgan जवळील जांभुळपाडा Jambulpada येथे गॅस कनेक्शन तपासणी करणारे कारागीर यांचे कडून गॅस व्हॉल्व मधून गॅसची गळती Gas Leakages होत असतांना चेक करणेसाठी माचीस काडी पेटवल्याने खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने घरातील चार व्यक्ती भाजल्याची घटना घडली असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .

या बाबतचे वृत्त असे की म्हसगण जवळील जांभूळपाडा येथे श्रीराम गॅस एजन्सीने Shriram Gas Agencies Jambhulpada नेमलेले मांगीलाल बैष्णव नावाचे कारागीर गॅस कनेक्शन दुरुस्तीसाठी गेले असता सायकाळी ६ ते ६:30 वाजे दरम्यान अलबाड यांचे घरी कनेक्शनची रबरी नळी बदलत असताना मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झालेली होती त्यातच काडी पेटवल्याने खोलीत पसरलेल्या गॅसने पेट घेतला.

दरम्यान, तुषार रमेश अलबाड वय ३१ वर्ष , ओकार गोपाळ खोटरे १३ वर्ष , डिम्पल खुशाल अलबाड वय २८ वर्ष , गोवर्धन परशराम भोये वय ४० सर्व राहाणार जांभूळपाडा यांचे गुडघ्यापर्यंत पाय भाजले . परिसरात वाहनाची सोय नसत्याने त्यांना मोटर सायकल वरुण उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पोलीसानी पंचनामा आदी प्रकिया सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.