
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
येथील जेलरोड परिसरात असलेल्या नारायण बापूनगर जवळील लोखंडे मंगल कार्यालय परिसरातील एका घरात महिला स्वयंपाक करीत असताना अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. या स्फोटात महिलेसह तीन मुले भाजल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
नारायण बापूनगरमध्ये असलेल्या लोखंडे मंगल कार्यालय समोर पत्र्याची चाळ असून या चाळीमध्ये अनेक भाडेकरू राहतात. या ठिकाणी एका घरामध्ये सुगंधा सोळंकी (24) ही महिला आपल्या मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना डबा देण्यासाठी गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करत होती.
परंतु अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व त्यामुळे घरावरील पत्रे उडाले तसेच हा स्फोट झाल्याचे समजताज आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. परिणामी यात मुलगा रुद्र तसेच आर्यन व सूर्या हे दोघे तिघेजण किरकोळ रित्या भाजले. त्यांची आई सुगंधा सोळंकी या सुद्धा स्फोटामध्ये काही प्रमाणात भाजल्या.
त्यानंतर त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना अग्निशामक दलाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.