<p>नाशिक | Nashik</p><p>सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे (दि.०५) च्या सायंकाळी गॅस टाकीच्या स्फोटात घर जळून खाक झाले आहे. </p> .<p>दरम्यान गॅस लिक झाल्याने त्याने अचानक पेट घेतला. यामध्ये घरास आग लागून संसारोपयोगी साहित्य, वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धान्य, रोख रक्कम, शैक्षणिक कागदपत्रे आदी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.</p><p>या आगीमुळे दिनेश देशमुख नामक तरुणाचा संसार उघड्यावर पडला असून स्थानिक स्तरावरून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.</p>