कचर्‍याच्या ठिकाणी सुशोभिकरण ; सिन्नर नगरपरिषदेचा उपक्रम

कचर्‍याच्या ठिकाणी सुशोभिकरण ; सिन्नर नगरपरिषदेचा उपक्रम

सिन्नर । अमोल निरगुडे | Sinnar

सिन्नर नगर परिषदेकडून (Sinnar nagar parishad) वेळगा उपक्रम हाती घेतला असून शहरात जिथे-जिथे कचरा (Garbage) टाकला जातो अशा ठिकाणी छोटा बगिचा (Small garden) उभारुन कचरा टाकणार्‍यांना आळा घालण्याचे काम सुरु केले आहे.

नगर परिषदेला नुकतेच ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत’ (swacha sarvekshan) राज्यात दुसरे मानांकन मिळाले असून राज्यभरात नगर परिषदेचे कौतुक होत आहे. अद्यायावत मैला व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन (Waste management), कचर्‍यापासून खतनिमिर्ती प्रकल्प (Composting project), ओला-सुका कचर्‍याचे विलगीकरण (Separation of wet-dry waste), अद्यायवत घंटागाड्या (gantagadi) यामुळे आज शहर ‘कचरामुक्त’ (Garbage free) झाले आहे. यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य सेवकांचा (Health workers) मोलाचा वाटा असल्याचे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

नगर परिषदेला दुसरे मानांकन मिळाल्यानंतर आता आरोग्य विभागाची जबाबदारीही तितकीच वाढली आहे. याचसाठी मुख्याधिकारी संजय केदार (Chief Officer Sanjay Kedar) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने (Department of Health) स्तृत्य उपक्रम हाती घेतला आहे. दररोज शहरासह उपनगरांत कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या फिरत असतानाही अनेक महिला या घंटागाड्यांत कचरा टाकण्याचा कंटाळा करतात.

तसेच काही नोकदारवर्ग दिवसभर घरी नसल्याने घंटागाडी आल्यावर जागेवर नसल्याने घरात साचलेला कचरा रात्रीच्या वेळी मोकळी जागा दिसेल तिथे तो कचरा फेकत असतात. शहरातील जाखडी गल्ली, कुरणे गल्ली परिसर, वावी वेस, सरदवाडी रोड परिसर, बाजारवेस, गंगावेस, सरदवाडी बायपास परिसरांसह अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागेंवर नागरिक कचरा उघड्यावर फेकत असतात. यामुळे कुत्रे, मोकाट जनावरांचा याठिकाणी उच्छाद वाढत असतो.

मोकाट प्राण्यांमुळे हा कचरा परिसरात पसरला जातो. अशात कचर्‍यातील जेवणातील खरकटे, सडलेला भाजीपाला, प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्याने परिसरात दुर्गधीही पसरते. येथून ये-जा करणार्‍या नागरिकांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तर कचर्‍यावर बसणार्‍या माश्या, किटके आसपासच्या घरात शिरक ाव करत असल्याने आरोग्याच्या समस्याही उद्भवतात.

नगर परिषदेकडून वेळोवेळी जनजागृती करुनही नागरिक मनमर्जीप्रमाणे वाटेल तेथे कचरा टाकून पळ काढतात. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून ज्या-ज्या ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जातो. अशा ठिकाणी नगर परिषदेकडून छोटा बगिचा साकारण्यात येत आहे. या बगिच्यात फुलांच्या झाडांसह शोभेची झाडे लावण्यात येत असल्याने कचरा टाकणार्‍यांना यामुळे आळा बसणार आहे.

नगर परिषदेकडून नुकतेच शहरातील जाखडी लेन परिसरात अशा बगिच्याची निर्मिती केली असून त्यामुळे येथे कचरा टाकण्याचे प्रमाण शुन्य झाले आहे. नगर परिषदेकडून प्रथमच असा उपक्रम राबवून बघितल्यानंतर कचरा टाकणार्‍यांना आळा बसल्याने अशा प्रकारचे अनेक बगिचे तयार करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

परिसरात दरवळला सुगंध

शहरातील जाखडी गल्ली परिसरात नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे चित्र होते. त्यानंतर वनप्रस्थ फाऊंडेशनच्या काही सदस्यांनी पुढाकार घेत याठिकाणी छोटा बगिचा साकारण्याचे संकल्पना नगरपरिषदेकडे मांडली. यानंतर येथे रस्त्याच्या कडेला छोट्या स्वरुपात विटांचे बांधकाम करुन त्यात माती टाकून फुलांचे व शाभेचे झाडे लावण्यात आली. आधी कचरा पडत असलेल्या ठिकाणी दुर्गंधी येत होता. मात्र, त्याचठिकाणी फुलांचे झाडे लावल्याने येथून ये-जा करण्यार्‍यांना फुलांचा सुगंध येत आहे.

कुरणे गल्लीत दुसरा बगीचा

जाखडी गल्लीत या उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर कचर्‍या टाकणार्‍यांवर आळा बसल्याने महात्मा फुले विद्यालयाच्या शेजारी असलेल्या कुरणे गल्ली परिसरातही या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यानंतर शहरात ज्या ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे अशा ठिकाणीही अशा प्रकारचा बगिचा उभारण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com