बायपासला कचर्‍याचे साम्राज्य

दिवाळी उत्सवात कचर्‍याचे बकाल ढीग
बायपासला कचर्‍याचे साम्राज्य

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune highway) सरदवाडी परिसर सध्या कचरा डेपो (Garbage Depot) म्हणून नावारूपाला येत आहे. बायपासच्या सर्व्हिसरोडच्या (Service Road) कडेला नागरिकांकडून दिवाळीची (diwali) साफसफाई केलेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील मोठी बाजारपेठ व नवीन सिन्नर (navin sinnar) म्हणून ओळख झालेल्या सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांमध्ये हजारो कामगार राहतात. त्यामुळे दिवस-रात्र या परिसरात नागरिकांची रेलचेल असते. या भागातून हजारो कचरा रोज जमा होतो. नगरपरिषदेकडूनही (nagar parishad) या परिसरात दररोज घंटागाडी पाठवण्यात येते.

सध्या दिवाळीमुळे (diwali) प्रत्येक घरात साफसफाईचे काम करण्यात आल्याने दररोजपेक्षा अधिक कचरा प्रत्येक घरातून निघत आहे. मात्र, अनेक महिला व कामगार कचरा घंटागाडीत (ghantagadi) टाकण्याचा कंटाळा करत रात्रीच्या वेळी सरदवाडी बायपास परिसरात नेऊन टाकतात.

दिवसभर कामावर अथवा उंच इमारतीतून खाली घंटागाडीत कचरा टाकण्याकडे अनेकजण कानाडोळा करतात. मात्र, रात्री जेवण झाल्यानंतर अनेक जण चक्क चारचाकीत कचरा भरून सरदवाडी बायपासच्या सर्व्हिसरोडच्या कडेला सर्रासपणे फेकून पळ काढतात. लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून परिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत येथे कचरा फेकत आहेत.

परिसरातील नागरिक प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये (Plastic bags) घरातील कचरा भरत वेळी येथे आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. बायपासच्या सर्व्हिसरोडने अनेकजण पायी फिरायला जात असल्याने त्यांना नाक दाबूनच येथून जावे लागते. दिवसेंदिवस या कचर्‍यात वाढच होत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

नगरपरिषदेकडून कारवाई व्हावी

बायपास परिसराच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने अनेक जण येथे फिरायला येतात. थकल्यानंतर याच परिसरात ते विसावा घेतात. मात्र, याच झाडांच्या खाली कचरा टाकला जात असल्याने परिसराचे सौंदर्यही कमी होत आहे. त्यामुळे येथून पायी जाणार्‍यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषदेने या ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com