सिन्नर ग्रामीण रुग्णालय परिसरात अस्वच्छता

सिन्नर ग्रामीण रुग्णालय परिसरात अस्वच्छता

सिन्नर । वार्ताहर sinnar

करोना ( Corona ) काळात रुग्णांसाठी वरदान ठरलेले सिन्नर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय ( Sinnar Sub District Hospital ) सध्या कचर्‍याचे माहेरघर बनले असून रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत आहे.

रुग्णालयात सध्या मोजकेच कोरोना रुग्ण असून या ठिकाणी सफाई कर्मचार्‍यांचीही संख्या मोठी आहे. सुरुवातीला रुग्णालयासह परिसराची चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवण्यात येत होती. मात्र, दिवसें-दिवस परिसरात घाणीचे साम्राज्य बघायला मिळत आहे.

रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, वापरलेले हॅन्डग्लोज, नारळ, मुदत संपलेल्या गोळ्या, औषधांचे रिकामे बॉक्स पडलेले बघायला मिळत आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचाही परिसरात वावर वाढला असून रुग्णांच्या जीवालाही त्यातून धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी कचरा लक्ष वेधून घेतो तर काही भिंतींचे कोपरे गुटख्याच्या पिचकार्‍यांनी भरलेले दिसतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com