दुचाकी चोरून ग्रामीण भागात स्वस्तात विकायचा; 'गुन्हे शोध'ने आवळल्या मुसक्या

दुचाकी चोरून ग्रामीण भागात स्वस्तात विकायचा; 'गुन्हे शोध'ने आवळल्या मुसक्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर पोलिसांनी (Gangapur police Station) सात दुचाकी चोरणार्‍या चोरट्यास कॅनडा कॉर्नर परिसरातील सापळा रचत शिताफीने ताब्यात घेतले. (Suspects arrested in bike robbery case) अनिकेत अहिरे (व.२२, रा.मिशन मळा, कॅनडा कॉर्नर) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून त्याच्याकडून चार लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत....

पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सटाणा (Satana) व लखमापूर (Lakhmapur) येथून चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीवर गंगापूर (Gangapur), सातपूर (Satpur) व अंबड पोलिस ठाण्यात (ambad police station) दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.

अधिक माहिती अशी की, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, संशयित मोटार सायकल चोर मिशन मळा, कॅनडा कॉर्नर याठिकाणी असल्याचे समजले. यानंतर गुन्हे शोध पथकाने याठिकाणी सापळा रचला.

यानंतर पोलीस नाईक मोहिती, परदेशी, जगताप, भोये यांनी ही सापळा कारवाई यशस्वी केली. अनिकेत अहिरे यास ताब्यात घेत व्यावसायिक पोलीस कौशल्याचा वापर करून चौकशी केली असता त्याने बागलाण तालुक्यातील लखमापूर व सटाणा येथून सात चोरलेल्या दुचाकी आणल्या.

या वर्णनाच्या मोटारसायकली गंगापूर पोलीस स्टेशन, अंबड व सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे समोर आले आहे. सातही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, पोलीस हवालदार बोळे, पोलीस नाईक मोहिती, महाले, परदेशी, चव्हाण, भोये, शिंदे, जगताप, चौधरी, जाधव यांच्या पथकाने कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com