दिलासादायी : गंगापूर धरण समूहात 'इतके' पाणी; गंगापूर धरणातील साठाही वाढला

दिलासादायी : गंगापूर धरण समूहात 'इतके' पाणी; गंगापूर धरणातील साठाही वाढला
गंगापूर धरण (File Photo)

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik district dam water level) गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरीदेखील गंगापूर धरणक्षेत्रात (Gangapur Water Shed) पावसाची संततधार सुरु आहे यामुळे गंगापूर धरणाची (Gangapur Dam) टक्केवारी वाढून ९० टक्के इतकी झाली आहे.....

गंगापूर धरण समुहात ८३ टक्के साठा झाला आहे. दारणा (Darna), भावली (Bhavali), वालदेवी (Waldevi), कडवा (Kadva) ,धरणातुन विसर्ग (Water Discharged from the dams) सुरू आहे. आता पावसाचा जोर जर ओसरला तर पाण्याचा विसर्ग घटणार आहे.

दरम्यान, आळंदी धरण (Alandi Dam) १०० टक्के भरले आहे तर कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात (Kashyapi and Gautami Godavari Dam) अनुक्रमे ६४ आणि ७३ टक्के धरणसाठा आहे.

नाशिक शहरात सध्या दोन-तीन दिवसांपासून कडक ऊन पडले आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून श्रावणसरींची बरसात होते आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील आकडेवारी ६४ टक्के झाली आहे. जिल्ह्यातील लघु मध्यम आणि मोठ्या २४ प्रकल्पातील पाच धरणे १०० टक्के भरली असल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com