धरणसमुहात संततधार; गंगापुर धरण ७६ टक्के भरले
नाशिक

धरणसमुहात संततधार; गंगापुर धरण ७६ टक्के भरले

मुकणेत 59 टक्के जलसाठा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यातील संततधार पावसामुळे धरणात पुरेसा जल साठवण व्हायला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणात सद्यस्थितीत 76 टक्के जलसाठा आहे.

आज सकाळपर्यत गंगापूर धरणात 70 मि. मी. पाऊस झाल्याने या समुह धरणात 76 टक्के जलसाठ्याची नोंद झाली आहे.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर व दारणा समुह धरणातून दररोज सुमारे 18.5 दश लक्ष घन फुट इतका पाणी पुरवठा केला जातो. यात शहरातील 70 ते 80 टक्के भागाला गंगापूर समुह धरणातून पाणी पुरवठा केला जात असुन यंदा या धरण समुहात आज (दि.16) 76 टक्के इतका जलसाठा आहे.

मागील वर्षी 16 ऑगस्ट रोजी 99.08 टक्के इतका होता. यावरुन यंदा धरण पाणलोट क्षेत्रात 16 ऑगस्ट पर्यत पुरेशा पाऊस झालेला नाही. यात गेल्या चार पाच दिवसांपासुन या भागात कमी अधिक पाऊस सुरु झाल्याने दिलासादायक चित्र आहे.

विशेषत: त्र्यंबकेश्वर भागात चांगला पाऊस सुरु असुन आज सकाळपर्यत गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 70 मि. मी. पाऊसांची नोंद झाली आहे. मागील आठवण्यात गंगापूर समुह धरणातील साठा 50 टक्क्याखाली गेला असल्याने शहरात पाणी कपात करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडुन ठेवण्यात आला होता.

मात्र आता या भागात पाऊस सुरू झाल्यामुळे आता ऑगस्ट अखेरीपर्यत पाऊसाची प्रतिक्षा करुन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे.

अशीच स्थिती दारणा समुह धरणाची असुन याभागात देखील चांगला पाऊस झाल्यानंतर दारणातून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच मुकणे धरणातील साठा 59.15 टक्कयावर गेला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ; आजची स्थिती

धरण आजचा साठा टक्केवारी गत वर्षाची टक्केवारी

गंगापूर 4304 (द,ल.घ.फु.) 76.45 94.00

कश्यपी 688 37.15 99.08

गौतमी 892 47.75 95.34

एकुण 5884 62.93 95.40

दारणा 6557 91.72 84.98

मुकणे 7239 59.15 95.66

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com