नाशिक । Nashik

अप्रतिम वॉटर स्पोर्ट्सचा थरार, निसर्गसौंदर्याने नटलेला बॅकवॉटर परिसर आणि अत्यंत सुंदर परिसरात वसलेले नाशिक येथील नेचर बोट क्लब सज्ज झाले आहे.

उद्यापासून हा नेचर बोट क्लब सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून गंगापूर धरणालगत साकारलेल्या नाशिकरांच्या नेचर बोट क्लब अखेर उद्यापासून सुरु होणार आहे.पहिल्या टप्प्यात अकरा बोटी सुरू करण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. तर पर्यटकांना येण्यासाठी आणखी २४ बोटी तयार असणार आहेत.