नाशिककरांनो ! पाणी जपून वापरा अन्यथा..

गंगापूर धरण साठ्यात घट, पाणी कपात अटळ
नाशिककरांनो ! पाणी जपून वापरा अन्यथा..

नाशिक | Nashik

नाशिक शहराचा (Nashik City) पाणी पुरवठा (Water Supply) करणार्‍या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सतत पाणी साठी कमी होत आहे. तर दुसरीकडे पाहीजे तसा पाऊस न पडल्याने नाशिक शहरावर पुन्हा पाणी कपातीचे संकट (Crisis of water cut) निर्माण झाले आहे. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. तरी पुढील महासभेत (Mahasabha) पाणी कपातीचा विषय येणार असल्याचे समजते.

महापौर सतीष कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी मनपा अधिकार्‍यांसह गंगापूर धरण व्हिजीट (Visit At Gangapur Dam) करुन पाणी साठ्याची माहीती घेतली होती. त्यावेळी पाणीसाठा मुबलक होता, तर हवामान विभागाचे (Weather Department) देखील यंदा चांगला पाऊस पडणार अशी शक्यता व्यक्त केली होती.

यामुळे यंदा नाशिककरांवर पाणी संकट राहणार नाही, अशी घोषणा महापौर कुलकर्णी यांनी केली होती, मात्र जुन महिन्यात पाहीजे त्या प्रमाणात शहरात व विशेषत: धरणाच्या पाणलोट श्रेत्रात पाऊस न पडल्याने गंगापूर धरणात पाणी साठा कमी झाला आहे. म्हणून नाशिककरांनी आतापासूनच पाणी जपून वापरावे, असे आवाहन होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com