टोळक्याची घरावर दगडफेक

टोळक्याची घरावर दगडफेक

नवीन नाशिक | प्रतिनिधी

येथे जुन्या भांडणाची (quarrel) कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने एकाच्या घरावर दगडफेक (Stone Throwing) करून चारचाकीची काच फोडत दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

याबाबत साधना सुनील पाटील (४०,रा.दौलत नगर शिवपुरी चौक,नवीन नाशिक) यांनी पोलिसांत (Police) दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीचा मुलगा गौरव पेन महाले याचे आकाश आव्हाड, विजय आव्हाड यांच्याशी गेल्या आठवड्यात भांडण झाले होते.

यानंतर त्याचा राग मनात ठेवून (दि.६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांचे साथीदार गणेश कुऱ्हे, गैस (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह येत पाटील यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करत त्याठिकाणी असलेल्या एका चारचाकी गाडीची मागील काच फोडली.

दरम्यान, संशयितांनी पाटील यांना तुमच्या मुलाला बघून घेवू असा दम दिला होता. त्यानंतर याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक बनतोडे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com