महिलेवर सामुहिक अत्याचार; संशयितांना पाच दिवसांची कोठडी

महिलेवर सामुहिक अत्याचार; संशयितांना पाच दिवसांची कोठडी

ओझे | वार्ताहर Oze

वणी बसस्थानक परिसरात ४५ वर्षीय महिलेवर मध्यरात्री सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. वणी शहरासह जिल्ह्यात खळबळ या घटनेमुळे उडाली असून याप्रकरणी आज दुपारी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यरात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास पीडीत महिला बस स्थानक परिसरात एका व्यक्तीशी बोलत होती. या दरम्यान या ठिकाणी दुचाकीवर काही तरुण आले व त्या ठिकाणाहून महिलेला जबरदस्ती करून घेऊन गेले.

त्यात दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांच्यासोबत अजुन दोघे जण होते या सर्वानी तीला उचलुन नदीकडील परिसरात नेत दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पिडीत महिलेसोबत बोलणाऱ्या व्यक्तीने वणी पोलीस ठाण्यात येऊन सांगितली, त्यानुसार वणी पोलीसांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला.

वणी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.स्वप्निल राजपुत यांनी आपल्या कर्मचा-यांना सुचना देत तपासचक्र वेगवान केले. घटनास्थळी एक दुचाकी आढळून आली त्यासाठी पोलीस परिसरात दबा धरून बसले होते. काही वेळात दुचाकी घेण्यास आलेल्या संशियत तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सर्वांची नावे सांगितले, पोलिसांनी विलंब न करता सर्व आरोपींना चार तासातच अटक केली. यात सोमनाथ कैलास गायकवाड वय २३, संदिप अशोक पीठे, वय २४, राजेंद्र दिपक गांगोडे, वय २६, आकाश शंकर सिंग वय २४ सर्व राहणार इंदिरानगर वणी येथील आहेत.

पोलिसांनी या संशयितांना अटक केली आहे. घटना पाहता फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपासणी केली. परिस्थितीजन्य पुरावे यावेळी पोलिसांनी हस्तगत केले. संशयितांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पिडीतेची वैद्यकीय तपासणी वणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करुन तपास पथकास मार्गदर्शन केले. वणी पोलीसांनी चार तासातच गुन्हयातील आरोपींना अटक केली. वणी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.स्वप्निल राजपुत, पो.उ.नि.रतन पगार, पो.कर्मचारी बच्छाव, आण्णा जाधव, किरण धुळे, प्रदिप शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com