तोतया पोलीस बनून खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद

तोतया पोलीस बनून खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद

वावी | वार्ताहर( Vavi )

सिन्नर शिर्डी महामार्गावर ( Sinnar- Shirdi Highway ) तोतया पोलीस(fake police)बनून खंडणी वसूल करणारी टोळी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपी अवस्थेत असलेल्या तीन ते चार तरुणांनी सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी जवळ असलेल्या मोटो कार्लो कंपनीच्या कॅम्प जवळ टोल नाका परिसरात रात्री दोनच्या सुमारास वाहनांना अडवून आपण स्वतः पोलीस असल्याचे भासवत वाहन चालकाकडून इंट्री मागत 200 ते 500 ची मागणी करत उच्चाद मांडला होता व वाहन चालकाने पैसे न दिल्यास त्यांना मारहानीची कृत्य देखील हेच तोतया पोलीस करत होते.

याची कुण कुण वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना लागताच कोते यांनी आपल्या सहकाऱ्यांन समवेत सापळा रचून या तोतया पोलिसांना रंगेहात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वावी पोलीस ठाणे ( Vavi Police Station ) हद्दीत रस्त्यावर रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या वाहनांचे मारहाण करून पैसे काढून घेणे व पैसे न दिल्यास बेदम मारहाण करणे असे प्रकार सुरू होते याबाबत वावी पोलीस ठाण्यात अनेकांच्या तक्रारी पडून होते मात्र रात्रीच्या सुमारास चोऱ्या करणारे सदर आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होत होते.

मात्र काल दि.11 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी चक्क वावी जवळील टोल नाक्याचा फायदा घेत टोल नाक्याच्या जवळच खंडणी वसूल करण्याचे काम असतानाच पोलिसांनी आपल्या खात्या दाखवत आरोपी ज्ञानेश्वर कांदळकर, रामा शेळके, रमण सुलाखे व गौरव घोटेकर या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भा द वि ३८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर होते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी पोलीस हवालदार नितीन जगताप करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com