टोळक्याचा पती-पत्नीवर हल्ला

टोळक्याचा पती-पत्नीवर हल्ला

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

तीन जणांच्या एका टोळक्याने पती-पत्नीवर हल्ला (Attack) करून पतीला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

कैलास जाटव (रा. सोनवणे मळा, मरी माता मंदिराजवळ, नाशिकरोड) हे व त्यांची पत्नी जेलरोड परिसरात असलेल्या जय किराणा स्टोअर्समध्ये किराणा घेत असताना या ठिकाणी अजय अशोक सिंग व व त्याचे दोन जोडीदार आले.

त्यांनी कैलास जाटव यांना म्हटले की तू आमच्याकडे का बघतोस असे कारण काढून कैलास जाटव व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने कैलास जाटव यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर सिंग व त्याचे दोन जोडीदार फरार झाले. दरम्यान या घटनेप्रकरणी जाटव यांच्या पत्नीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुराडे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com