
नाशिक रोड | प्रतिनिधी
देवळाली गाव येथे तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका युवकावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला असून या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला झालेल्या युवकाचे नाव अमन शेख असे असून सदरचा हल्ला हा देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्याच्या पाठीमागे झाला आहे. जुन्या भांडणाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजत असून हल्ला झाल्यानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण होऊन पळापळ झाली. दरम्यान या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले असून हल्ला करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेत आहे.