वर्गणी गोळा न करता गणेशोत्सव
नाशिक

वर्गणी गोळा न करता गणेशोत्सव

उत्सव समिती अध्यक्षपदी महादू बेडकुळे

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | प्रतिनिधी

येथील द्वारका चौक शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे 54 वे वर्ष असून यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावटा असल्याने वर्गणी गोळा न करता सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे.

करोना प्रादुर्भाव असल्याने मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात मंडळाची नियोजन बैठक होऊन सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी महादू बेडकुळे यांची निवड करण्यात आली.

सध्या अर्थ चक्र बिघडल्याने व्यापारी वर्ग, व्यावसायिक, दुकानदार आदींवर आर्थिक संकट कोसळेल आहेत. म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ वर्गणीदार, हितचिंतकांकडुन कोणत्याही प्रकारची वर्गणी घेणार नाही.

तर गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे, रक्तदान, सोशल मीडियावर व्याखान, चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी, उत्सव समिती अध्यक्ष बेडकुळे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com