ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबक नगरी

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबक नगरी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथे गणेशोत्सव मंडळात गणेश विसर्जनसाठी मोठा उत्साह दिसून आला. मुख्य मिरवणुकीत येथील १० मंडळांच्या समावेश होता. त्रंबकेश्वरचा राजा, महाराजा युवा मंच, भगवती चौक, टीबीके राजा मंडळ, नीलंबिका मंडळ, युवा मंच अशी विविध मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली....

नवशक्ती मित्र मंडळ, प्रचिती राजमंडळ यांनी पालखी मिरवली. 15 फूट उंच मूर्ती महाराजा युवा मंच मंडळाची होती. ढोल-ताशांच्या तालावर अनेकांनी ठेका धरला. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक संस्कथांकडून गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले. शिवनेरी धर्मशाळा येथे त्र्यंबक नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष लोहगावकर तसेच उपनगराध्यक्ष सभापती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी स्वागत केले.तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्रंबकेश्वर मंदिरासमोर श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्तांनी मंडळांचे स्वागत केले. यासाठी स्थानिक विश्वस्त आणि सहकारी उपस्थित होते. लक्ष्मीनारायण चौकात सारडा पतसंस्थेतर्फे दुग्ध पान देत गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. महाराजा युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी स्वागताबद्दल आभार मानले.

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबक नगरी
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

सिद्धिविनायक सामाजिक कला व क्रीडा मंडळाकडून श्री गणेश विसर्जन प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण संस्थेने शु. य. मा. स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाचे आरासद्वारे दर्शन घडवले.

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबक नगरी
नाशकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच थांबले ढोल-ताशांचे वादन

गौतम तलावावर योग्य ती दक्षता नगरपालिकेने घेतली होती. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती नियोजन होते. गणेश मूर्तीचे संकलन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com