'एकता'ची भव्य मिरवणूक ठरली विसर्जनाचे आकर्षण

'एकता'ची भव्य मिरवणूक ठरली विसर्जनाचे आकर्षण

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

भव्य दिव्य आकर्षक मिरवणुकीची (Procession) परंपरा जपणाऱ्या सटाणा नाका भागातील (Satana Naka area) एकता मंडळाची मिरवणूक यंदाच्या श्री विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली.

महाराष्ट्रासह जम्मू कश्मीर, पंजाब, कर्नाटक, राज्यातील वेगवेगळ्या शहरातून बोलविण्यात आलेले ६०० पेक्षा अधिक कलावंतांनी (Artists) आपल्या वेगवेगळ्या कलेसह सादर केलेले नृत्याचे अविष्कार मिरवणूक मार्गावर उपस्थित महिला, पुरुष, अबालवृद्ध हजारो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले...

भव्य मूर्ती व आकर्षक मिरवणुकीची परंपरा जपणाऱ्या एकता मंडळाने (Ekta Mandal) यंदा पेण (Pen) येथून सिंहासनाधीस्थीत २१ फुटी उंच गणरायाच्या भव्यमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ही मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवाचे (Ganesh festival) विशेष आकर्षण ठरली. तसेच करोना (corona) निर्बंधामुळे दोन वर्ष मिरवणूक काढता न आल्याने यंदा आगळीवेगळी व भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय मंडळाचे संस्थापक सुनील गायकवाड व कार्यकर्त्यांनी घेतला होता.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक (Karnataka) राज्यातील उडपी चंडी नृत्य पथक, कथ्थक नृत्य पथक, पंजाब (Punjab) राज्यातील भांगडा नृत्य पथक, जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील कलावंतांचे नृत्य पथक महाराष्ट्रातील नवापूर व अक्कलकुवा येथील आदिवासी तरुण-तरुणींचे नृत्य पथक पुणेरी ढोल पथक मोर नृत्य पथक हलगी पथक लेझीम पथक आदी वेगवेगळ्या शहरातून कलावंतांचे १९ पथक मिरवणुकीसाठी पाचारण करण्यात आले होते. तब्बल ६०० पेक्षा अधिक कलावंतांचा या पथकांमध्ये समावेश असल्याने मिरवणुकीस भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

'एकता'ची भव्य मिरवणूक ठरली विसर्जनाचे आकर्षण
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

यावेळी ढोल ताशे हलगी व लेझीमच्या निनादात सुरू झालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर महिला पुरुष आबालवृद्ध भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. तसेच तालुक्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक (devotee) मिरवणूक पाहण्यासाठी आले होते.

तर कलावंतांनी आदिवासी नृत्य (Tribal dance) लेझीमचे वेगवेगळे खेळ, कोळी नृत्य, पंजाबी भांगडा, कश्मीरी नृत्य, कथक नृत्य, सादर करण्यास प्रारंभ होताच भाविकांनी एकच जल्लोष केला होता. तर सशस्त्र दलाच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

'एकता'ची भव्य मिरवणूक ठरली विसर्जनाचे आकर्षण
Photo Gallery : गणपती विसर्जनानंतर 'अशी' आहे गोदाघाटावरील स्थिती

तसेच मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी मंडळाचे संस्थापक सुनील गायकवाड (Sunil Gaikwad) मदन गायकवाड (Madan Gaikwad) अध्यक्ष महावीर जैन, सर्जेराव पवार, राकेश शिंदे, सोनू आसी, दीपक गायकवाड, किशोर गुप्ता, जयेश पटेल, भगवान गायकवाड, आदींसह एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली ही मिरवणूक अत्यंत संथ गतीने पुढे सरकत मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास महादेव घाटावर पोहचल्यानंतर गणपती बाप्पाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com