नाशकात गणपती विसर्जनाला सुरुवात

नाशकात गणपती विसर्जनाला सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन नाशिकसह शहरातील विविध भागात कृत्रिम कुंडांमध्ये गणपती विसर्जनाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी कृत्रिम कुंड उभारण्यात आली आहेत.

नवीन नाशिकमध्ये नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

नाशकात गणपती विसर्जनाला सुरुवात
राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक मनपाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

मिरवणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व्हिडिओ चित्रीकरणातूनही मिरवणुकीवर लक्ष ठेवत आहेत. नाशिक मनपाने सहाही विभागांत गणपती विसर्जनाची व्यवस्था केली असून प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com