येवल्यात उत्साहात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा

येवल्यात उत्साहात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा

येवला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात झाला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येवल्यात धूम पाहायला मिळत आहे.

आजपासून गणेश उत्सव सुरू झाला असून गणेश उत्सवा करता लागणारे सजावटीसाठीचे साहित्य, मूर्ती खरेदी करण्यासाठी खास गणेशोत्सवासाठी येथील स्वामी मुक्तनंद विद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या स्टोलवर झुंबड उडाली होती.

यावेळी इको फ्रेंडली सजावट साहित्य बाजारात आले असून त्यात मखर, फुलांच्या माळा, पताका आदि सर्व गोष्टी या इको-फ्रेंडली असून या सजावट साहित्यच्या किंमतीत मध्ये 25 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे.

थर्माकोल बंदी असल्यामुळे बाजारात कागदापासून, पुष्ट्यापासून तयार करण्यात आलेले इकोफ्रेंडली सजावट साहित्य विक्रीस आले आहे. या साहित्य विक्रेत्यांना देखील कोरोनाचा फटका बसला असून या साहित्यामध्ये 25 टक्के इतकी वाढ झाली आहे.

दोन वर्षापूर्वी गणेशभक्त आठ ते दहा दिवस अगोदर सजावट साहित्य घेण्यासाठी गर्दी करत होते. करोनाच्या सावटामुळे भाविकांची काल गुरुवारी व आज शुक्रवारी बाजारात गर्दी झाली आहे.

येवल्यात उत्साहात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक
गणरायाची सजावट करुन पूजा व प्रतिष्ठापणा करण्यात आली. कोरोना काळामुळे अनेकांनी विविध प्रकारचे ऍपचा आधार घेत गुरुजींना न बोलवता घरीच पूजा केली.
गणरायाची सजावट करुन पूजा व प्रतिष्ठापणा करण्यात आली. कोरोना काळामुळे अनेकांनी विविध प्रकारचे ऍपचा आधार घेत गुरुजींना न बोलवता घरीच पूजा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com