गणेश मूर्ती विक्रीसाठी मनपा स्टॉल खरेदीसाठी मोठा प्रतिसाद

गणेश मूर्ती विक्रीसाठी मनपा स्टॉल खरेदीसाठी मोठा प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापाकिकेकडून (NMC) राबविण्यात आलेल्या गणेश मूर्ती विक्री स्टाॅल (Ganesh Murti Stall) लिलावास मुर्ती विक्रेत्यांचा थंड प्रतिसाद मिळात आहे. एकूण ३१२ पैकी फक्त २७ स्टाॅल्सची विक्री झाली. नाशिकरोड (Nashikroad) व नाशिक पश्चिम (Nashik west division) विभागात एकही स्टाॅलला बोली लागली नाही. गणोशोत्सव अगदी वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेच्या स्टॉलला अत्य अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे महापालिका प्रशासनाचे डोकेदुखी वाढणार आहे....

चालू महिना अखेर ३१ ऑगस्टला गणपतीचे (Ganesh Chaturthi) आगमन होत असून मागील दोन वर्षांपासून करोनाच्या निर्बंधामुळे (Covid Outbreak) सार्वजनिक स्वरुपातील गणेशोत्सव आयोजनावर विरजण पडले होते. यंदा मात्र राज्य सरकारने सर्व निर्बंध शिथील केल्याने मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे.

महापालिकेलडून सहा विभागात गणेश मुर्ती विक्रीसाठी पाच ऑगस्टला ३१२ स्टाॅलसाठी लिलावाचे आयोजन केले होते. मात्र या लिलावाला मुर्ती विक्रेत्यांनी पाठ फिरवली. अवघ्या २७ स्टाॅलची विक्री होऊ शकली.

२४५ स्टाॅल अद्याप विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. दहा बाय दहाच्या स्टाॅलसाठी दहा हजार रुपये भाड्यामुळे लिलावास प्रतिसाद लाभला नसल्याचे समजते. त्यामुळे लिलावातून (Auction) प्राप्त होणार्‍य‍ा आर्थिक उत्पन्नावर (income) महापालिकेला पाणी सोडावे लागले.

दरम्यान, स्टाॅलची विक्री व्हावी यासाठी आता महापालिकेने लिलावाचा नाद सोडला असून प्रथम येईल त्यास प्राधान्य ही निती अंमलात आणली आहेे, असे समजते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com