यंदा 'या' धरणावर गणेश विसर्जनास बंदी

आढळल्यास कायदेशीर कारवाई
यंदा 'या' धरणावर गणेश विसर्जनास बंदी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

जिवीतहानी, वित्तहानी, व जल ध्वनी प्रदुषण,अपघात तसेच गणपती मुर्ती ( Ganesh Idols )विटंबना रोखण्यासाठी पिंपळद (ना) ग्रामपंचायतीतर्फे वालदेवी धरणावर गणपती विसर्जनास बंदी (Ganpati immersion banned in Valdevi Dam ) घालण्यात आली आहे.

नाशिक शहरातून गणपती विसर्जनासाठी वालदेवी धरणावर ( Valdevi Dam )भाविक मोठ्या संख्येने जात असतात.यामुळे येथील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते याशिवाय याठिकाणी यापूर्वी अपघात देखील घडले आहेत तसेच पाण्यामध्ये गणपती मूर्तीची विटंबना देखील होत असल्याने पिंपळद (ना) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव पास करून यंदा वालदेवी धरणावर गणेश मूर्ती विसर्जनास बंदी केली असून कुणी येथे मूर्ती विसर्जन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील आदेशित करण्यात आले आहे.

याकरिता ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त नाशिक, जिल्हा पोलिस अधिक्षक ग्रामीण,तहसीलदार नाशिक, पोलिस निरीक्षक वाडीवऱ्हे पोलिस ठाणे , कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com