
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे गणरायाच्या विसर्जनाच्यावेळी (Ganesh Idol Immersion) गणरायाचे दर्शन घेतले.
करोनाचे (Corona) नियम पाळून, गर्दी न करता सर्वांनी गणेश विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal), माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) व भुजबळ कुटुंबिय उपस्थित होते.