गामणे मैदानाच्या समस्या सोडविणार: बडगुजर यांचे आश्वासन

गामणे मैदानाच्या समस्या सोडविणार:  बडगुजर यांचे आश्वासन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील गामणे मैदानाची मोठयप्रमाणात दुरवस्था झाली असून त्याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे

यासाठी प्रयत्न करा अशा मागणीचे निवेदन (memorandum) परिसरातील नागरिकांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Shiv Sena Metropolitan Chief Sudhakar Badgujar) यांना दिले असता हा प्रश्न लवकरच मार्गी लावू,असे आश्वासन त्यांनी दिले.

गामणे मैदान जॉगिंग ट्रॅकला (jogging track) जागोजागी पडलेले खड्डे (potholes), स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था, म्युझिक सिस्टीमचा (Music system) असलेला अभाव, मुलभूत बाबींची असलेली कमतरता यामुळे परिसरातील नागरिक आणि जॉगिंगला येणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे

युवासेना उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ यांनी सह्यांची मोहीम राबवली आणि बडगुजर यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर बडगुजर यांनी त्यांना वरीलप्रमाणे आश्वस्त केले. या निवेदनावर संजय मोरे,प्रमोद उपाध्ये,जे.बी.शेळके,एस.डी.सदगीर,एम.बी.पवार,अरुण पाटील,हिरामण पवार आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com