भावी नवनियुक्त जि. प. सदस्य निधीला मुकणार

भावी नवनियुक्त जि. प. सदस्य निधीला मुकणार
जि. प. नाशिक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) नवीन प्रशासकीय इमारतीबांधकाम (New administrative building construction) प्रगतीपथावर असून या इमारतीच्या खर्चात तब्बल 12 कोटींनी वाढ झाली आहे. यामुळे पुढील वर्षभरात येणार्‍या नवनियुक्त सदस्यांना हक्काच्या सेस निधीला (fund) मुकावे लागणार आहे. सध्या 72 गटात साधारणत: प्रत्येकी 9 लाख रुपये इतका निधी (fund) मिळणार होता. मात्र, यासाठी पुन्हा जिल्हा परिषदेच्या ठरावाची वाट बघावी लागणार आहे.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधली जात आहे. इमारतीची मूळ रक्कम 25 कोटी रुपये असताना जिल्हा परिषदेने 20 कोटी रुपयांची निविदा (Tender) प्रसिध्द केली. 20 टक्के कमी दराने म्हणजेच 16 कोटी रुपयांना अभिजित बनकर यांच्या क्रांती कन्स्ट्रक्शनला काम मिळाले आहे. इमारतीचे बांधकाम सुरु झाल्यानंतर प्राकलनात अमुलाग्र बदल झाला आणि इमारतीची मूळ किंमत 12 कोटींनी वाढून आता 37 कोटींपर्यंत पोहोचली आहे.

राज्य शासनानेच (state government) यापूर्वी सांगितल्यानुसार यापुढील म्हणजेच 25 कोटींवरील संपूर्ण रक्कम जिल्हा परिषदेला (zilha parishad) स्वनिधीतून खर्च करावी लागेल. शासनाच्या गाईडलाईन्स (Guidelines) स्पष्ट असल्यामुळे जिल्हा परिषदेची कोंडी झाली आहे. हा वाढीव खर्च कोणत्या निधीतून द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला वार्षिक मुदत ठेवींवरील व्याजातून वर्षाकाठी मिळणारे सुमारे साडेसहा कोटी रुपये जिल्हा परिषद सदस्यांना सेस निधीतून मिळतात.

त्याआधारे 3054 या हेडअंतर्गत ते खर्च केले जातात. परंतु, येणार्या नवीन सदस्यांना मिळणारा निधी हा नवीन इमारतीकडे वर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने सदस्यांना पहिल्याच वर्षी सेस निधीला मुकावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.