नाशिक | Nashik

आज रविवारी (दि.०६) सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात गर्दी झाल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.

यामुळे प्रशासन भाविकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याने देवी संस्थानचे विश्वस्त सत्कार करण्यात मग्न असल्याचे पाहावयास मिळत आहे.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या करोनामुळे शासकीय आदेश, जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु सप्तशृंगी मंदिर परिसरात भाविकांचा ओघ वाढत असून करोनाच्या नियमांना पायदळी तुडवले जात आहे. यावर प्रशासनाचा देखील अंकुश नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देवी संस्थानवर जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्फत विश्वस्त मंडळ नियुक्त केली जाते. परंतु एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना अशा परिस्थितीवर देवी संस्थान काय पाऊल उचलते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.