पाणी योजनांसाठी निधी मंजूर : डॉ. कुंभार्डे

पाणी योजनांसाठी निधी मंजूर : डॉ. कुंभार्डे

चांदवड । वार्ताहर | Chandwad

तळेगांवरोही गटासाठी जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) 2702 अंतर्गत नवीन सिमेट बंधारे (dam), तसेच दुरुस्ती कामांसाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर (Funding approved) झाला असून ही सर्व कामे महिनाअखेर सुरू होतील, अशी माहिती भाजपा गटनेते डॉ आत्माराम कुंभार्डे (BJP group leader Dr. Atmaram Kumbharde) यांनी दिली.

चांदवडच्या (chandwad) डोंगर माथ्यावरून तळेगांवरोही जि.प. गटात लेंडी, गोई, रामसिता, रामगुळणा यासह काही छोट्या नद्या वाहतात. सन 2019-2021 मधील अतिवृष्टी व गुलाब चक्री वादळामुळे या नद्यांवरील बहुतांश केटीवेअर बंधार्‍यांची दुरावस्था झाली. त्यामुळे पाणी साठवण क्षमता (Water storage capacity) कमी झाल्याने बंधारे दुरुस्ती (Dam repair) आवश्यक आहे. हा भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो.

या भागात पाटकालवे नाहीत. त्यामुळे जि.प. सदस्य डॉ. कुंभार्डे यांनी पाठपुरावा करून ही कामे मंजूर करून घेतली. त्यात वाकी बु. बंधार्‍यासाठी 16 लाख, रेडगांव खुर्द येथे चार केटीवेअर दुरुस्तीसाठी 24 लाख, नन्हावे येथे गावतलाव दुरुस्तीसाठी 10 लाख, निंबाळे येथे गांगुर्डे वस्तीवर बंधारा बांधण्यासाठी 7 लाख, वडगांवपंगु येथे दोन बंधारे बांधण्यासाठी 50 लाख, रापली येथे दोन बंधारा बांधण्यासाठी 51 लाख,

वाहेगांवसाळ येथे दोन बंधारे दुरुस्तीसाठी 15 लाख, पन्हाळे (panhale) येथे सिमेंट बंधारा (Cement dam) बांधण्यासाठी 16 लाख, कातरवाडी येथे दोन बंधारे बांधण्यासाठी 58 लाख, वागदर्डी येथील बंधार्‍यासाठी 14 लाख 50 हजार, काजीसांगवी येथील बंधारा दुरुस्तीसाठी 5 लाख 50 हजार, तर भडाणे व पिंपळद येथे सिमेंट बंधारे दुरुस्तीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये प्रस्तावित आहेत.

गत पाच वर्षांच्या काळात 2702 अंतर्गत तब्बल चार ते सहा कोटींची उपलब्धता करून गरज असेल तेथे नवीन बंधारे अथवा दुरुस्तीची कामे केल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन सिंचनक्षेत्र वाढणार आहे. जलयुक्त शिवाराचीही कामे केल्याने गटातील गावांचा दुष्काळी अनुशेष भरून काढण्यासाठी डॉ. कुंभार्डे यांनी प्रयत्न केल्याबद्दल गटातील शेतकरी (farmers) व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com