सायखेडा गोदावरी पुलासाठी निधी मंजूर

जिर्ण पुलाऐवजी नवीन पुलाचे काम
सायखेडा गोदावरी पुलासाठी निधी मंजूर

निफाड। प्रतिनिधी | Niphad

गोदाकाठ परिसरातील नागरिकांना दळण-वळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार्‍या तसेच सद्यस्थितीत अतिशय जिर्ण झालेल्या पुलामुळे (Bridge) अवजड वाहनांना पुलावरून बंदी घालण्यात आली होती.

मध्यंतरीच्या काळात बससेवा (Bus service) देखील बंद होती. परिणामी या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी नव्याने पुलाचे बांधकाम (Construction of bridge) करावे अशी मागणी वारंंवार होत असतांनाही त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. अखेरीस सन 2021-2022 या अर्थसंकल्पात (Budget) विशेष बाब म्हणून सायखेड्याजवळील गोदावरी नदीवर (godavari river) पुलाचे बांधकाम करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी (fund) मंजूर झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी दिली आहे.

तालुक्यात गोदावरी (godavari), दारणा (darna) नद्यांचा संगम होवून त्या सायखेडा (Saykheda), चांंदोरी (chandori) मार्गे नांदूरमध्यमेश्वर धरणात (Nandurmadhyameshwar dam) येवून मिळतात. चांदोरी ते सायखेडा दरम्यान गोदाकाठच्या गावांना जोडणारा सायखेडा येथील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. परिणामी हा पूल धोकादायक बनल्याने येथे नव्याने पूल बांधण्याची मागणी गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांकडून (farmers) होत होती.

तसेच पावसाळ्यात गोदावरी, दारणा नद्यांना येणारे महापुराचे (floud) पाणी अनेकवेळा पुलावरून वाहून हा मार्ग खंडीत होत असे. तसेच गोदावरी नदीला अनेक उपनद्या येवून मिळतात. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते. सद्यस्थितीत या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहे. नदीपात्रातील वाळू उपशामुळे जुन्या पुलाचा पाया कमकुवत झाला आहे. अवजड वाहनांमुळे पुलाला हादरे बसत आहे. हा पूल केव्हाही कोसळून गोदाकाठ परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तविली जात होती.

तसेच पावसाळ्यात 25 ते 30 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसून चांदोरी, सायखेड्यासह 30 ते 35 गांवाचा तालुक्याशी व इतर गांवाशी संपर्क तुटतो. सदर पुलावर पुरस्थितीमध्ये जवळपास 10 फुटाहून अधिक उंचीपर्यंत पाणी येत असल्याने 3 ते 4 दिवस वरील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे चांदोरी ते सायखेडा 1 कि.मी. पर्यंत रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे पूरपरिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तुंचा व औषधांचा पुरवठा करणे शक्य होत नाही.

तसेच सध्या अस्तित्वात असलेला जुना पूल हा सुमारे 50 वर्षापूर्वी बांधलेला असून आज रोजी सदरचा पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय घातक झालेला आहे. तसेच या पुलाची सध्याची रुंदी 6.50 मीटर असून सदरचा रस्ता ओझर, सायखेडा, पंचाळे, वावी, शिर्डी, पुणतांबा रस्ता राज्य मार्ग क्र. 35 असल्याने व रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता आजमितीस सदर पुलाची रुंदी 12 मीटर असणे आवश्यक आहे. याशिवाय वरील मार्गास जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने व पर्यायी व्यवस्था नसल्याने सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ सुरु असते.

परंतु नेहमी गोदावरी नदीला येणार्‍या पुरामुळे कमकुवत पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे भविष्यात सावित्री नदीवरील पुलासारखी मोठी दुर्घटना होऊन जीवीत व वित्तहानी होऊन तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आदी विविध मुद्दे आमदार दिलीप बनकर यांनी शासन स्तरावर प्रखरतेने मांडल्यामुळे गोदावरी नदीवरील नवीन मोठ्या पुलास शासनाने मंजुरी दिली आहे. तर येथे पूल मंंजूर झाल्याबद्दल गोदाकाठच्या नागरिकांनी आ. दिलीप बनकर यांचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com