
कळवण । प्रतिनिधी | Kalwan
कळवण शहरातील (kalwan city) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) प्रशासकीय इमारतीच्या (Administrative building) बांधकामासाठी आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या (state government) अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर (Funding approved) करण्यात आला असून
ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर (Green building concept) आधारीत प्रशासकीय इमारतीची वास्तुरचना असून बांधकामासाठी नैसर्गिक वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार (Kalwan's city president Kautik Pagar) यांनी दिली.
कळवण (kalwan) हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची वाढती लोकसंख्या व मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीची सुसज्ज अशी सर्वसोयींनीयुक्त इमारत व्हावी या उद्देशाने प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी (fund) मिळविण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar), नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन निधीची मागणी केलेली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये नगरपंचायतीना देण्यात येणार्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सन 1987 मध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी चौकात कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार हे सरपंच असतांना कळवण ग्रामपालिकेची इमारत बांधण्यात आली. त्या इमारतीत सध्या नगरपंचायतचे कामकाज सुरु असून इमारतीची स्थिती पाहता कामकाजात अनेक अडचणी येतात. मुख्याधिकारी यांच्या व्यतिरिक्त अन्य पदाधिकारी यांना स्वतंत्र दालन नसल्याने सभागृहातच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडीच्या बैठकाबरोबर कामकाज गेल्या 7/8 वर्षांपासून सुरु आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, प्रशासन तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विषय समितीच्या सभापतींसाठी दालने आणि सभागृह नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे कळवण नगरपंचायतसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणे गरजेचे असल्यामुळे राज्य शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्यामुळे प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कामकाज सुरु असलेल्या इमारतीच्या जागेवर मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.
अशी असेल प्रशासकीय इमारत
कळवण नगरपंचायत नवीन प्रशासकीय इमारत गांधी चौकात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे.सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालन असणार असून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विषय समिती सभापती यांच्यासाठी स्वतंत्र दालन, स्वतंत्र सभागृह असणार आहे. नागरीकांच्या सेवेसाठी तळ मजल्यावर स्वतंत्र कर आकारणी विभाग व अंध अपंगांच्या सोयीसाठी उद्वाहकाची सोय करण्यात येणार आहे. ग्रीन बिल्डींग संकल्पनेवर आधारीत वास्तुरचना असून नैसर्गिक वस्तुंचा बांधकामासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ग्रॅनाईट, दगड, गोध्रा विट, व्हेन्टीलेशनसाठी गोध्रा जाळ्या यांचा वापर करण्यात येणार आहे. उत्तम व्हेंटीलेशन साठी लॅा ाफ थर्मोडायनॅमिक्सच्या सिध्दांतावर आधारीत गरम हवा वरच्या दिशेने बाहेर काढण्याची सोय करण्यात येणार आहे.
50 ते 55 शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी घेरलेल्या कळवण शहराची आर्थिक आणि सामाजिक प्रगती हे शहराचे भूषण आहे. कळवण हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीच्या सुसज्ज अशा सर्वसोयींनीयुक्त प्रशासकीय इमारतीसाठी आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पात 5 कोटी मंजूर झाले आहे.
- कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण
गेल्या पाच वर्षात कळवण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावताना शहरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलून विकासकामे मार्गी लावली.मध्यवर्ती ठिकाणी प्रशासकीय इमारतीची गरज ओळखून त्यासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे. शहराच्या दिवसागणिक वाढत्या विस्तारामुळे भविष्यात कळवण नगरपंचायतला विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
- आमदार नितीन पवार