जिल्हा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : भुजबळ

जिल्हा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : भुजबळ
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील वर्षी करोनाच्या (corona) संकटात नियोजित विकासकामांसाठी निधी (development works fund)) मिळाला नव्हता. मात्र यंदाही अशीच परिस्थिती असल्याने निधी (fund) मिळतील का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मात्र निधी कमी पडू देणार नाही, तसेच शेतकर्यांच्या विजे बाबत असलेल्या समस्यांबाबत आमदारांना घेऊन आपण उर्जा मंत्र्यांशी (energy minister) याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन भुजबळांनी (bhujbal) बैठकीत दिले आहे.

जिल्हा नियोजन समितीची (District Planning Committee) बैठक पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (District Annual Plan), सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजनाबाबत 2021-22 अंतर्गत डिसेंबर 2021 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले कि, 90 टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. मार्च आखेर पर्यंत उर्वरीत सर्व निधी खर्च होईल, तसेच आमदारांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर बैठकीत इतर विषय देखील मंजूर करण्यात आले.

दरम्यान कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीचे (Economic downturn) प्रतिबिंब जिल्हा नियोजन आराखड्यावर पडल्याचे दिसून आले. कारण पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणायसाठी निधीची आवश्यकता असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मागील वर्षी करोनाच्या संकटात नियोजित विकासकामांसाठी निधी मिळाला नव्हता. मात्र यंदाही अशीच परिस्थिती असल्याने निधी मिळतील का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र निधीमध्ये कमी पडू देणार नाही, असे आश्वासन भुजबळांनी बैठकीत दिले आहे.

त्याचबरोबर विजवितरण कंपनीकडून (Distribution Company) शेतकर्यांची (farmer) विजजोडणी तोडली जात आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर या प्रश्नाबाबत लवकरच आपण जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन उर्जा मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. शहरात हेल्मेट सक्तीवरून (Helmet) प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने कारवाईबाबत अतिरेक होत आहे.याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. यात सुधारणा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ही आपली संस्कृती नव्हे

भाजप आयटी सेलकडून रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्य टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता महिलांबाबत आक्षेपार्य बोलणे ही आपली संस्कृती नव्हे, या शब्दात भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले. महिलांच्या संदर्भात तर बोलताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. नागपूर येथील संघ हेडक्वार्टरची रेकी करणार्या पाकिस्तानी हेरला ताब्यात घेतल्याबाबत बोलताना संघ मुख्यालय जवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची आहे असे ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com