शासकीय वस्तिगृहांचे रुपडे पालटणार; 'इतक्या' कोटींचा निधी मंजुर

शासकीय वस्तिगृहांचे रुपडे पालटणार; 'इतक्या'    कोटींचा निधी मंजुर
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक । Nashik

राज्यातील शासकीय वसतिगृहांतून (Government Hostels) हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. समाज कल्याण विभागामार्फत (Social Welfare Department) राज्यात एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे चालवली जातात.या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासासाठी पूरक वातावरण तयार व्हावे,याकरिता विभागाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यातुनच राज्यातील ३३ वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

राज्याचे समाज कल्याण आयुक्त (Social Welfare Commissioner) डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Naranware) यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांच्या बांधकामा संदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक (Online review meeting) आयोजित करण्यात आली असता त्याप्रसंगी याबाबत माहिती दिली आहे. त्यात मुबई विभागास १.८१ कोटी, लातुर विभाग १.३२ कोटी, अमरावती विभाग २.७८ कोटी, पुणे विभाग १.२३ कोटी, नाशिक विभागास २४ लक्ष ७२ हजार,नागपुर विभाग २ लक्ष ४० हजार , औरंगाबाद विभाग ७ लक्ष ८७ हजार, याप्रमाणे एकुण ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी क्षेत्रीय कार्यालयाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अध्यायावत करणे, इमारत कलरिंग करणे, कोटींग करणे, आवार संरक्षण भिंत उभारणे, शौचालय,बाथरुम,खिडक्या,दरवाजे, तारेचे कम्पाउंड, भिंतींची दुरुस्ती, ग्राऊंड फ्लोरिगं, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रिट लाईट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाईल्स बदलविणे, वॉटर प्रुफिंग, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, बोअरवेल बाधकाम करणे,अशी कामे करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यासाठी विशेषता शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून वसतीगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणाऱ्या वसतीगृहांतून अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाची वसतीगृहे ही केंद्रे बनली आहेत. विद्यार्थांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान ह्या वसतीगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्वाची भुमिका असलेल्या शासकिय वसतिगृहाच्या इमारतींची दुरुस्ती करुन सर्व आवश्यक सोईसुविधासह विद्यार्थ्यांना निवासासाकरिता तसेच अभ्यासाकरिता यामुळे पुरक वातावरण उपलब्ध होणार आहे.

राज्यातील एकुण ४४१ शासकीय वसतीगृहापैकी ३३ वसतिगृहाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सन २०२१-२२ मध्ये प्राप्त झाले होते.त्यासदंर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत होता.समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे व सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर होऊन निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतुन वसतीगृहाचा दर्जा अधिक उंचविण्याबरोबरच विद्यार्थाची गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.

डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com