वडांगळी देवस्थानाच्या विकासासाठी निधी देणार

राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार
वडांगळी देवस्थानाच्या विकासासाठी निधी देणार

सिन्नर । वार्ताहर Sinnar

राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार (State Rural Development Minister Abdul Sattar) यांनी नुकतेच तालुक्यातील वडांगळी (Vadangali) येथील सतीदेवी-सामतदादा देवस्थानला (Sati Devi-Samatdada Devasthan) सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी या देवस्थानला ब दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करणार असून यासाठी मुंबई (Mumbai) येथे लवकरच बैठक बोलावण्यात येईल. तसेच देवस्थानच्या विकासासाठी शासनाच्या वतीने 25 लाख रुपये निधी (Fund) उपलब्ध करून देवू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी समस्त बंजारा समाज तसेच देवस्थानच्या वतीने ना. सत्तार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, औरंगाबाद जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, दारासिंग चव्हाण, उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उदय सांगळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे, तंटमुक्ती अध्यक्ष सुदेश खुळे, निमाचे संचालक राजेश गडाख, देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

संस्थानाच्या विकासाठी सर्वोतोपरी मदत

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देवस्थानच्या कामकाज बाबत आढावा घेऊन मंदिराची पाहणी केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी बांधिलकी जपत समाजाभिमुख कार्य करणार्‍या राज्यातील धर्मशाळा, मठ, देवस्थानचा विकास झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची आग्रही भूमिका असून राज्य सरकार यासाठी उपाययोजना करीत आहे अशी माहिती देत वडांगळी येथील संस्थांनाचे कार्य प्रेरणादायी असून सतीदेवी-सामतदादा देवस्थानच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करू असे ना. सत्तार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com