मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर

मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर

सटाणा । प्रतिनिधी Satana

तालुक्यातील मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी (Mulher Rural Hospital) 22 कोटी रुपयांच्या निधीस (fund) राज्य शासनाची (state government) मंजूरी प्राप्त झाल्याची माजी आमदार दीपिका चव्हाण (former mla deepika chavan) यांनी दिली.

नाशिक (nashik) येथे जुलै 2009 मध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) खान्देश विकास पॅकेज (Khandesh development package) अंंतर्गत बागलाण तालुक्याच्या (Baglan taluka) आदिवासी अतीदुर्गम भागातील आदिवासी (Tribal Community) बांधवांसाठी मंजूर झालेल्या मुल्हेर (ता.बागलाण) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) शासनाने चालू विधानसभा अधिवेशनातील (Assembly session) पुरवणी अर्थसंकल्पात (Budget) 22.02 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी (Approval of funds) दिली असल्याचे स्पष्ट करीत

माजी आमदार चव्हाण यांनी, बागलाण तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना 50 ते 60 किलोमीटर अंतरावर सटाणा (satana) व नामपूर येथे उपचारांसाठी येणे अडचणीचे व गैरसोईचे होते. तातडीच्या उपचारांसाठी नाईलाजास्तव त्यांना कळवण (kalwan) उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 1,67,800 हेक्टर असून मुल्हेर हे 40 ते 50 आदिवासी खेड्यांना जोडणारे प्रमुख महसुली गाव आहे.

या परिसरातील आदिवासी बांधव आरोग्य सेवेपासून (Health Services) नेहमीच वंचित आहेत. अति दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे या भागातील सर्वसामान्य रुग्णांचे अतोनात हाल होत असतात. त्यामुळे प्रसूती काळ, सर्पदंश यांसह अनेक लहान-मोठ्या साथी आणि इतर आजारांमुळे अनेक आदिवासी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आपल्या प्राणास त्यांना मुकावे लागत होते. एका तालुक्यात तीन पेक्षा जास्त ग्रामीण रुग्णालये देऊ नये,

असा शासनाचा नियम असताना आग्रह करून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाची उपयुक्तता आणि गरज लक्षात आणून दिल्यावर या ग्रामीण रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश आले. यानंतर चालू हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात रुग्णालयासाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

यापूर्वी चव्हाण यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभा अधिवेशनात ठराव मांडून सदर प्रस्ताव विधानमंडळाच्या विनंती अर्ज समितीसमोर मांडला. यानंतर मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी शासनस्तरावर गती प्राप्त झाली. आता प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे माजी आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सातत्याच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर आदिवासी बांधवांसाठी हक्काचे असलेल्या मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंंत्री छगन भूजबळ आदींच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येईल.

- दीपिका चव्हाण, माजी आमदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com