निधी नियोजन ढासळले?

निधी नियोजन ढासळले?
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात अवघा 20 टक्के निधी खर्च झाला (20 percent of the funds were spent ) होता.पुढील आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या निधीच्या मर्यादेमध्ये 53 कोटी रुपये कपात करण्यात आली होती. एकीकडे असमान निधी वाटपावरून लोकप्रतिनिधींचा रोष असताना दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीकडून (District Planning Committee)निधी खर्चाबाबत कोणतेही नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत नाही.

मार्चअखेर आला तरी नियोजन झाले नसल्याची बाब निदर्शनास येत असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता याबाबत सध्या कोणतीही बाब उघड करता येणार नाही. 1 एप्रिल रोजी माहिती मिळेल, असे उत्तर दिले आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने नाशिक जिल्ह्याकरता सर्वसाधारण, आदिवासी आणि समाजकल्याण अशा तिन्ही उपाययोजनांसाठी मिळून मंजूर 860.86 कोटींचा निधी जिल्ह्यास वितरीत केला. जिल्ह्यास इतका निधी प्राप्त झाल्यानंतरही 8 जानेवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार 201.10 कोटी रुपये म्हणजे अवघा 20 टक्केच निधी खर्च झाला. दोनच महिन्यांपूर्वी असमान निधी वाटपावरून पालकमंत्री भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती.

नांदगाव मतदारसंघातील कामांचा निधी परस्पर ठेकेदारांना वितरीत केल्यावरून आ. सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील यापूर्वीचा वाद न्यायालयातही गेला होता. हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. यानंतर तरी डीपीडीसीच्या कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आजही परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येते. 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असून डीपीडीसीच्या निधी वितरण व खर्चाबाबत आढावा घेतला असता वितरीत निधी आणि खर्च निधी याबाबत कुठलीही माहिती प्रसिद्ध करता येण्यासारखी नाही असे सांगत जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Related Stories

No stories found.