पळसन आरोग्य केंद्राला कोटींचा निधी

पळसन आरोग्य केंद्राला कोटींचा निधी

पळसन । वार्ताहर | Palsan

कळवण (kalwan)- सुरगाणा (surgana) विधानसभेचे आमदार नितीन पवार (mla nitin pawar) यांच्या यशस्वी प्रयत्नातून पळसन आरोग्य केंद्राच्या (Health Center) नवीन इमारतीसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून पाच कोटी रूपये मंजूर केले आहे.

आ. नितीन पवार यानी करोना (corona) काळात आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली होती. पळसन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची (Primary Health Center) इमारत ही 25 ते 30 वर्षाची जुनी आहे. या ठिकाणी पावसाळ्यात शेताला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने तातडीच्या रुग्णांना रुग्णसेवा देण्यास अडचण येते. इमारत ही जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी जीवित हानी होऊ शकते.

इमारतीचे नविन बांधकाम करणे व वैद्यकीय अधिकारी निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान बांधणे, या इमारतची जीवित हानी होण्याअगोदरच पळसन येथील तरुण युवकांनी आमदार पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून इमारतीसाठी नवीन इमारतीसाठी मागणी केली असता पवार यांनी तात्काळ तरूणाची दखल घेऊन पाच कोटी निधी (fund) मंजूर केला आहे. त्यामुळे पळसन परिसरातील नागरिकांनी आमदार पवार यांचे आभार मानले.

पळसन प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) अलंगुन, चिंचपाडा, पळशेत, आमदा, भवाडा या गावाना उपकेंद्र आहे. उंबरदे, खडकमाळ, पायरपाडा, कोटबा, मेंरदड, देवळा, हातरूडी, रानपाडा, चिकारपाडा, बोरपाडा, वागण, आवळपाडा, बेडवळ, दुधवळ, वाघाडी, पातळी, कहाडोसा, गहाले, पिपळसोड, सुळे, मोखपाडा, नाईकपाडा, तोरणडोगरी, बाफळुन आदी गावे येतात. या परिसरातील अंदाजे लोकसंख्या 19931 इतकी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com