वारकऱ्यांच्या सुविधांसाठी कोटींचा निधी

वारकऱ्यांच्या सुविधांसाठी कोटींचा निधी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सुरू होणाऱ्या आषाढी वारीतील सहभागी वारक-यांचा (Varkari) आनंद व्दिगुणित करण्यासाठी राज्य सरकारने (state government) पालखी मार्गावर वारक-यांच्या सोयीसुविधांसाठी २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी (fund) उपलब्ध करून दिला आहे. ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. वारीला पुणे (pune), सातारा (satara), सोलापूर (solapur) जिल्ह्यातून मार्गक्रमण करत विविध संतांच्या पालख्या जात असतात. पालख्यांसोबत लाखों वारकरी पायी असतात.

वारक-यांना सोयी सुविधांसाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींच्या मागणीच्या ५० टक्के रक्कम उपलब्ध करून द्यावी. तर उर्वरीत ५० टक्के रक्कम ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हा परिषदेकडे (zilha parishad) उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या योजनेसाठी जिल्हा परिषदांच्या एकूण मागणीच्या ५० टक्के निधी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यानुसार पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २ कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी ग्रामविकास विभाग वितरित करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com