सप्तशृंगी गडावर स्वागत कमान, पथदिपांसाठी निधी

सप्तशृंगी गडावर स्वागत कमान, पथदिपांसाठी निधी

सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Garh

साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड हा देशातील शक्तिपीठांपैकी एक महत्वाचे ठिकाण मानले जाते.कमानीचे आकर्षरूप भाविक व ग्रामस्थांना बघावयास मिळणार आहे ,सप्तशृंगी गडाला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तीन कोटी बावीस लाखाचा निधी मंजूर करून पालक मंत्री दादा भुसे तसेच कळवण सुरगाणा आ.नितीन पवार यांचा मार्गदर्शनाखाली विविध गावाचा व पर्यायाने एकुणात्मक कळवण सुरगाणा मतदार संघाचे ध्येय उराशी बाळगून विविध मार्गाने निधीचा महापूर आणणार्‍या आमदार पवार यांचे तमाम सदर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तमाम ग्रामस्थ यांचा वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार यांचा सार्वजनिक जीवनातील समाजकारण आणि राजकारण कारकीर्दीपासून त्यांचा कार्यविचारांची निष्ठा कायम ठेवून त्यांचा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी एक दिलाने आणि एक विचाराने साथ देणार्‍या सप्तशृंगी गडाचा तीर्थक्षेत्राला भव्य दिव्य भाविक भक्तांना निवराशेड साठी निधी मंजूर करून मिळालेल्या हा भरीव निधी म्हणजे विधायक म्हणून निस्वार्थपणे जनतेचा केलेल्या समर्पक सेवेची पोहच पावती होय.

देवदर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना निवारा शेड हा निधी अतिषय उपयोगी ठरणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेची चौकट आणखी समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत सप्तशृंगी गड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून वरील ब दर्जा प्राप्त असणार्‍या देवस्थानांना एवढा भरीव निधी करणे कामी खूप मोठे सातत्य ठेवले होते.वास्तविक पाहता या ठिकाणी येणार्‍या भाविक भक्तांची गर्दी खूप मोठी असून सदर निधीमुळे येणार्‍या भाविकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.

विधान परिषद आमदार उमा खापरे यांचा माध्यमातून श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र शासन प्रार्देशिक पर्यटन विकास अंतर्गत भव्य दिव्य शंमशान भूमी बांधकाम करणे व गावाचा सुशोभीकरनात वाढ होण्यासाठी भव्य दिव्य प्रवेशद्वार (कमान) तसेच ठीक ठिकाणी सौर्य पथ दिवे असे महत्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आले आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचाकडून मंजूर विकास कामाचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्यात यावे असे परिपत्रक ग्रामपंचायत सप्तशृंगी गडाला प्राप्त झाले आहे.सप्तशृंगी गडाचा या विकासकामे साठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त दीपक पाटोदकर,विधानसभा , विधान परिषद आमदार उमा खोपरे, भाजपा नाशिक मा. शहर अध्यक्षा रोहिणी नायडू यांचे विशेष योगदान लाभले

सप्तशृंगी गडावर होणार सुसज्ज समशान भूमी ,

सप्तशृंगी गडावर भाविक व ग्रामस्थांना पावसाळ्यात वातावरणात अंत्यविधी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो तसेच सप्तशृंगी गडावर भाविक मयत झाल्याने त्यांनाही सप्तशृंगी गडावर अंत्यविधी करण्याची इच्छा असते या विचाराचा पाठपुरावा करून मंजुरी मिळाल्याने आता सप्तशृंगी गडावर लवकरच सुसज्ज समशान भूमीचे काम होणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके

सप्तशृंगी गड हे उंच शिखरावर असलेले आई सप्तशृंगी देवीचे पवित्र स्थान आहे याठिकाणी हजारो भाविक श्रद्धेपोटी पायी यात्री करतात याच अनुषंगाने सप्तशृंगी गडावर पायी येणार्‍या भाविकांना अंधारात सप्तशृंगी गडावर जंगल दर्‍याखोर्‍यातुन यावे लागतात यासाठी सप्तशृंगी गडाचा घाटात व गावअंतर्गत पथदिवे निधी मंजूर झाल्याने सप्तशृंगी गडाच्या देखाव्याला भर मिळेल

ग्रा.सदस्य राजेश गवळी,

मा. विधान परीषद आमदार सौ.उमा खापरे यांचा माध्यमातून सप्तशृंगी गडावर महाराष्ट्र शाशन प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत भव्यदिव्य स्वागत कमान, व शमशान भूमी बांधकाम सौर्य पथ दिवे साठी शब्दाला मान देऊन व भाविकांचा ग्रामस्थांचा विचारपूर्वक निर्णय घेऊन निधी मंजुरी दिली याबाबद्दल त्यांचे आभार

स.नि.देवी.ट्रस्ट विसवस्त अ‍ॅ‍ॅड.दीपक राजाराम पाटोदकर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com