इगतपुरी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ४१ लाखांचा निधी

इगतपुरी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ४१ लाखांचा निधी
पाणी पुरवठा

मुंबई | Mumbai

इगतपुरी पाणी पुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस ४१ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला...

इगतपुरी पाणीपुरवठा केंद्रास १९८८ मध्ये योजना कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही.

या पार्श्‍वभूमीवर योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 41 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या घसारा निधीतून उपलब्ध करून देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com