रस्ता काँक्रिटीकरणासाठी कोटींचा निधी मंजूर

रस्ता काँक्रिटीकरणासाठी कोटींचा निधी मंजूर

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

ग्रामीण भागातील (rural area) गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण (Concreting of roads) होण्यासाठी खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्याकडून सुरु असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्य शासनाच्या (State Govt) नियोजन विभागाने (Planning Department) नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक (nashik) आणि सिन्नर (sinnar) या तालुक्यांमधील गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक (Paver block) बसविण्याकामी साडेसहा कोटी रुपयांच्या निधीला (fund) मंजुरी दिली आहे. या निधीतून नाशिक तालुक्यातील 32 तर सिन्नर तालुक्यातील 22 गावांमधील रस्तांचे काँक्रिटीकरण होणार असून लवकरच या कामांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

गावांतर्गत रस्तांचे काँक्रिटीकरण (Concreting of roads) करण्याकामी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. याकामी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून गावस्तरावरील रस्त्यांची झालेल्या दुराव्यस्था विषयाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने नुकतेच नियोजन विभागाने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यातून नाशिक तालुक्यातील दुगांव, दरी, तिरडशेत, गंगाम्हाळुंगी, शास्त्रीनगर, आंबेबहुला, ओझरखेड, गंगावर्‍हे, गणेशगाव त्र., गणेशगांव, गिरणारे, गोवर्धन, गोविंदपूर, गौळाणे, चांदशी, जलालपूर, विल्होळी, सुभाषनगर, दुडगांव, पिंपळगांव गरुडेश्वर, महादेवपूर, महिरावणी, मातोरी, मुंगसरे, यशवंतनगर, राजेवाडी, रायगडनगर, लोहशिंगवे, वंजारवाडी, वासाळी, शिवनगांव, सावरगांव येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून प्रत्येक गावासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.

सिन्नर तालुक्यातील कणकोरी, खडांगळी, घोटेवाडी, जायगांव, देशवंडी, दोडी खु, पिंपळगावं, पिंपळे, वडगाव, वडझिरे, हिवरगांव, गोंदे, सांगवी या गावांमध्ये 20 लाखांचा निधी तर डुबेरे, देशवंडी, ब्राम्हणवाडे येथील स्मशानभूमी, मोहू, चास, वाडझिरे, खापराळे, खापराळे जि.प. शाळा पटांगण या कामांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com