क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी : नगराध्यक्ष मोरे

क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी : नगराध्यक्ष मोरे

सटाणा । प्रतिनिधी Satana

.सटाणा नगर परिषदेच्या ( Satana Town Council ) वतीने शहरातील मालेगांव रोड परीसरात अडीच एकर क्षेत्रात इनडोअर व आऊटडोअर क्रीडा संकुुलाच्या ( Sport Complex ) जमिन खरेदीसाठी प्रथमच शासनाने तीन कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

याबाबत बोलतांना नगराध्यक्ष मोरे यांनी शहरातील जनतेसह युवक युवतींना खेळ, व्यायाम व कसरतींसाठी खुले मैदान नसल्याचे स्पष्ट करीत, नगर परिषदेने शहरातील मालेगांव रोड परिसरातील सर्व्हे नं. 380 मधील 9320 चौ.मी. क्षेत्रासाठी 3 कोटी 70 लक्ष रूपये निधीचे नियोजन केले आहे. राज्य शासनाने 2 कोटी 82 लक्ष 15 हजार 891 रूपयांचा निधी दिला आहे. नगर परिषदेने 62 लक्ष 79 हजार 956 रूपये रकमेची तरतूद केली आहे.

राज्यशासनाच्या वतीने जमीन खरेदीसाठी 90 टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. नगर परिषदेचा 10 टक्के रकमेसाठी सहभाग आहे. सदर क्रिडा संकुलाचा क्रिकेट, 200 मिटर रनिंग ट्रॅक, स्विमींग पुल, बॅडमिंटन आदी मैदानी खेळांसाठी उपयोग होणार आहे.

क्रीडांगणामुळे शहराच्या वैभवात भर पडेल. सदरहू क्रिडांगण उभारणी करतांना मान्यवर क्रिडा शिक्षकांचे मनोगत जाणून घेणार असल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com