पाईपबंद कालव्यासाठी 25 कोटींचा निधी

पाईपबंद कालव्यासाठी 25 कोटींचा निधी

पाण्याचा अपव्यव टळून 1 हजार 403 हेक्टरक्षेत्र सिंचनाखाली : भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बोरी-अंबेदरी व दहिकुटे लघुपाटबंधारे प्रकल्पात ( irrigation small project) पारंपरिक कालव्याऐवजी ( Canal ) पाईपबंद कालव्याद्वारे ( Pipe Canal ) पाणीपुरवठा करण्यासाठीच्या कामास 25.21 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी दिली.

मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावाजवळ 1992 साली बोरी नदीवर बोरी-आंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्प तर दहिकुटे गावाजवळ 1975 साली कान्हेरी नदीवर दहिकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माती धरणाचे काम करण्यात आले आहे. बोरी-अंबेदरी धरणाचे लाभ क्षेत्रात झोडगे, अस्ताणे, जळकु, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, हरणशिकार या गावांतील 910 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित होते.

तर दहिकुटे धरणाचे लाभक्षेत्रात देवारपाडे, जळकु, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खु. या गावांचा समावेश असून 648 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित होते. कालव्याव्दारे पाणी वहन होत असतांना खडकाळ व मुरमाड जमिनीतून आर्वतन काळात 50 टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षात बोरी-अंबेदरी व दहीकुटे प्रकल्पाचे सरासरी 50 टक्के क्षेत्रास सिंचनाचा लाभ देऊ शकले आहे.

पाईपबंद कालव्यामुळे पुर्वीच्या पारंपरिक पद्धतीच्या कालव्याने मोठया प्रमाणात होणार्‍या पाण्याच्या गळतीत बचत होईल. त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील गावांच्या शेतीस आठमाही शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच ठिंबक व तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ होवून दहिकुटे लघुपाटबंधार्‍याचे 648 हेक्टर तर बोरी-अंबेदरी प्रकल्पाचे 755 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने लाभक्षेत्रातील गावामधील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

या योजनेमुळे मालेगाव तालुक्यातील दुष्काळप्रवण माळमाथ्यावरील गावांना लाभ होऊन शेतकर्‍यांची प्रगती होईल व त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मदत व सहकार्य झाल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com