एसटीकडून फुल्ल वाहतूक सुरू; प्रवाशांसाठी महत्वाची सूचना

उत्पन्नवाढीस हाेणार मदत
बस सेवा
बस सेवाdigi

नाशिक | Nashik

कराेनाचा संसर्ग लक्षात घेता एसटी महामंडळाच्या बसमध्ये पूर्वी केवळ ५० टक्केच प्रवाशांची मर्यादा ठेवली हाेती.

मात्र गुरूवारी (दि. १७) हा नियम रद्द करून महामंडळाने १०० टक्के प्रवासी अासनक्षमतेसह लालपरी रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवासाने मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असून प्रवासी वाहतुकीनंतर निर्जतूक करुनच मार्गस्थ केली जाणार अाहे. चार महिने एसटी बसेसद्वारे प्रवासी वाहतूक बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळ अडचणीत अाले हाेते.

मात्र राज्यशासनाच्या मिशन बिगिन अगेन अतर्गंत एसटी बसेसद्वारे जिल्हाअंर्तगत व जिल्हाबाहेरील प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात अाली हाेती. मात्र ही वाहतूक करतांना बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवासी वाहतुकीचे बंधन टाकण्यात अाले हाेते.

टप्पाटप्याने प्रवासी वाहतूक वाढत असल्याने अाता एसटी महामंडळाच्या वतीने गुजरात व कर्नाटक राज्याने १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने त्याच धर्तीवर राज्यातही सर्व प्रकारच्या बसेसद्वारे १०० टक्के अासनक्षमतेसह प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

नाशिक विभागात सद्यस्थितील विविध मार्गावर २२५ बसेस धावत अाहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गर्दी वाढल्यास तसेच अागामी सणाेत्सवाचा कालावधी लक्षात घेता टप्याटप्याने बसेसची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com