नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

सभापती कुटे यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन
नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) घातलेल्या थैमानाने शेतात पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान (Crop damage) झाले आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने संपुर्ण खरीप हंगामातील (Kharif season) पिके वाया गेली आहे.

त्यामुळे सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई (Indemnity) देण्यात यावी, अशी मागणी पं.स. सभापती सुभाष कुटे (Speaker Subhash Kute) यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांना निवेदन देत केली आहे.

सभापती कुटे यांनी दिलेल्या निवेदनात नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली तर शेळ्या-मेंढ्या, म्हशी, बैल, गाई आदी जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्यमुखी पडली आहेत. इलेट्रीक मोटार, जमिनी वाहून गेल्या आहेत.

त्याचे पंचनामे करून शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावे. तालुक्यात पाऊस सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याने शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी सभापती कुंटे यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com