फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

उपनगर पोलिसांची कामगिरी
फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

उपनगर पोलीस स्टेशनच्या Upnagar Police Station हद्दीत गेल्या तीन महिन्यापासून विविध गुन्हे अंतर्गत फरार असलेल्या तेरा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्या सर्वांना जेरबंद Criminals Arrested करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर Police Inspector Nilesh Mainkar यांनी तीन महिन्यापूर्वी उपनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला. त्यानंतर अभिलेख पडताळणी करून विविध गुन्हे अंतर्गत तसेच फरार असलेल्या रेकॉर्डवरील 13 गुन्हेगारांच्या मुसक्या माईनकर व त्यांच्या सहकार्‍यांनी आवळल्या असून यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार फरार होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर व त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक खडके, चौधरी, भामरे, उपनिरीक्षक लोंढे, बटुळे पाटील या सर्वांनी फरार असलेल्या तेरा आरोपींचा शोध घेतला व त्यांना जेरबंद केले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आदींनी माईनकर व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले.

दरम्यान अटक केलेल्या या गुन्हेगारांकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये काही दिवसापूर्वी येथील बिटको चौकात इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून त्याच्याकडील रक्कम व सोन्याची चेन लुटून पोबारा केला होता. तसेच देवळालीगाव येथील आदिनाथ सोसायटीमध्ये महिलेला धमकावून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा आठ लाखांचा ऐवज लुटण्याचा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोनच दिवसापूर्वी जय भवानी रोडवर अ‍ॅक्टिवा गाडीवर जाणार्‍या एका महिलेचे मंगळसूत्र चोरणार्‍या आरोपीलाही क्राइम ब्रांचच्या पथकाने अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com