१५ वर्षापासुन फरारी संशयित जेरबंद

गुन्हेशाखा युनिट क २ कामगिरी
१५ वर्षापासुन फरारी संशयित जेरबंद
जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सातपुर (satpur) पोलीस ठाण्याकडील गुन्हयातील फरार संशयित (Fugitive suspect) करमजितसिंग कपुरसिंग रिपियाल (५६, रा. लवटे नगर न १, अष्टविनायक रो हाऊस नंबर ४, जयभवानी रोड, नाशिकरोड),अनिल बाबुराव शिंदे उर्फ मामा (५४, रा. चाडेगाव राजवाडा, पोस्ट एकलहरा, ता. जि. नाशिक ) यांनी त्यांचे साथीदारांसह मिळून संगणमताने गुन्हयाचे फिर्यादी योगेश रामभाउ भवर (रा. श्रमीकनगर, सातपुर नाशिक) यांचे घरी येवून,

शिवीगाळ व दमदाटी करून तुझ्या वडीलांनी आमच्याकडून ६ लाख रुपये घेतले होते. त्याचे आता २४ लाख रूपये झाले आहेत. हे पैसे आम्हाला पाहिजे असल्याने तुझी प्रॉपर्टी आमचे नावावर करून दे असे बोलून संशयीतांनी त्यांच्या चारचाकी वाहनात त्याला बळजबरीने बसवुन एका फ्लॅटवर नेवुन दमदाटी केली व त्यांनतर त्यास दुयम निबंधक कार्यालय (Office of the Second Registrar) येथे नेवून योगेश यांच्या नावावरील ९ ये. हाउसच्या खरेदीखतावर सहया घेवून फिर्यादीची प्रॉपर्टी परविन इराणी याचे नावावर करून घेतली.

त्यानंतर योगेश यांनी सातपुर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात सुमारे १५ वर्षा पासुन सदरचे दोन्ही संशयित हे त्यांचा ठाव ठिकाणा बदलुन रहात होते. संशयित चाढ़ेगाव व लवटे नगर परिसरात लपुन रहात असल्याबाबत हवालदार राजेंद्र सोपान घुमरे यांना गोपनिय माहिती मिळाल्याने

वपोनी आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि अभिजीत सोनवणे, बेंडकोळी, हवालदार राजेंद्र घुमरे, संजय सानप यांनी संशयितांना चाडेगाव व लवटे नगर परिसरात शोध घेथुन सापळा रचुन ताब्यात घेतले. संशयितांना पुढील कार्यवाही करीता सातपुर पोलीस ठाण्यात हजर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com