Nashik Crime News : फरारी भामटा जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Nashik Crime News : फरारी भामटा जेरबंद;
खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सावतानगर परिसरात (Savatanagar Area) दहशत पसरविणाऱ्या फरारी भामट्याला पोलीस आयुक्तालयातील (Police Commissionerate) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Squad) मोठ्या शितीफीने जेरबंद केले आहे...

Nashik Crime News : फरारी भामटा जेरबंद;
खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव उमेश पाटील (वय २३, व्यवसाय- पानटपरी, रा. कलाकृती अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 2, माऊली लॉन्स जवळ, खुटवडनगर, नाशिक) असे त्याचे नाव असून त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे (Crime) दाखल आहे. संशयित पाटील हा दामोदर नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथे येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भुषण सोनवणे यांना मिळाली होती.

Nashik Crime News : फरारी भामटा जेरबंद;
खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
...म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलिसांच्या (Ambad Police) स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे पोनि. विद्यासागर श्रीमनवार, सपोनि प्रविण सुर्यवंशी, दिलीप भोई, किशोर रोकडे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण, सविता कदम यांच्या पथकाने केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com