इंधन स्वस्त; भाजपकडून स्वागत, विरोधकांनी काढला चिमटा

इंधन स्वस्त; भाजपकडून स्वागत, विरोधकांनी काढला चिमटा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इंधनाच्या दर (Fuel rate down) कमी करण्याचा निर्णयाचे भारतीय जनता पक्षाकडुन (BJP) जोरदार स्वागत करण्यात येत आहे. तर विरेाधकानी मात्र 'आले जमीनीवर' अशा शब्दात ३६ रुपये भाव वाढवून नंतर पाच रुपये कमी केल्याचा आरोप करत टीका केली जात आहे...

गेल्या चार महीन्यापासुन सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. (fuel rate hike from last four months) त्यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेट (budget disturbed due to fuel hike) कोलमडेले आहे. रोज होणारी भावावाढ पाहुन चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच काल रात्री अचानक केंद्र शासनाने (Central Government) शुल्क घटवत सुखद धक्का दिला.

दिवाळीची भेट (Diwali Surprise) म्हणुन त्याचे स्वागत होत असले तरी हा निर्णय दिवाळी पुर्वी घेतला असता तर कोट्यावधी जनतेला महागाईच्या झळा बसण्यापासुन वाचविता आले असते. आता दर कमी केले तरी झालेली भाववाढ काही कमी होणार नाही.

तसेच गेलले पैसेही काही परत मिळणार नाहीत. शुल्क माफी मागेही चार राज्यातील पोट निवडणुक निकालाचे (Four state election result) पडसाद अनेकाना दिसत आहेत. कारण तेथे भारतीय जनता पक्षाला सपाटुन मार खावा लागला. त्याची परिमिती शुल्क कमी करण्यात झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोशल मिडीयावर (Social media on fuel rate hike) जोरदार जुगलबंदी सुरु झाली आहे. वााढले 36 रुपये कमी केले पाच रुपये हा..हा.. हा..

नाक दाबताच तोंड उघडलेेले दिसते., आले जमीनीवर असे संदेश व्हायरल होत आहेत.

इंधन दर मूळ किंमत-35.50

केंद्र सरकार कर-19.50,

राज्य सरकार कर-41.55

वितरक कमीशन - 6.50

आज सरकारने पेट्रोल 5 रुपये व डिझेल 10 रुपयांनी दर कमी केले आहे. देशभरात आजपर्यंत 107 कोटी कोरोना लस केंद्र सरकारने मोफत दिली आहे. कोरोना काळात 80 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींना केंद्र सरकारने मोफत धान्य व मोफत गॅस सिलेंडर दिले आहे. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा झाला तेव्हा देशविदेशामधून ऑक्सिजन साठा पुरवुन केंद्राने अनेकांचे प्राण वाचविले.

कोरोना काळात रोजगार गमावलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर बँकिंग माध्यमातून अर्थपुरवठा / कर्जपुरवठा केला. शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6000 रुपये केंद्र सरकार जमा करते. खंबीर नेतृत्वामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश हिंदुस्थान जागतिक अर्थव्यवस्थेत टिकुन राहीला व जगात भारताची पत उंचावली आहे.

असे समर्थन करत आहेत. महाराष्ट्र सरकारने इंधनाचा अव्वाच्या सव्वा वाढवलेला कर निम्म्याने जरी कमी केला तरी पेट्रोल व डिझेलचे दर 20 ते 25 रुपयांनी अजुनही कमी होतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com