सर्वसामान्यांचे काम 'लॉक तर महागाई 'अनलॉक'

सर्वसामान्यांचे काम 'लॉक तर महागाई 'अनलॉक'

पेट्रोल, किराणा मालाची दरवाढ

देवगांव | Deogoan

गेल्या वर्षभरापासून करोनाचे संकट उभे ठाकले असतांना महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रोजगाराची साधने उपलब्ध नसतांना होणारी महागाई सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

दरम्यान गेल्या वर्षभरात किराणा, पेट्रोलमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोल लिटरला सरासरी २१ तर खाद्यतेल ५० रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर गॅस सिलिंडर, बांधकाम साहित्य दराची घोडदौड सुरूच आहे. करोनामुळे एकीकडे रोजगार कमी झाला, हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले, पण दुसरीकडे मात्र महागाईने पाय पसरल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने व्यवसाय, रोजगार यावर परिणाम झाला, सामान्यांची कामं बंद पडली, छोट्या विक्रेत्यांना तर दुकाने बंद करावी लागली. त्यातच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे महागाई आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहे. त्याचबरोबर करोना संकटाचा आयात- निर्यातीवर परिणाम झाला झाल्याने पाश्‍चात्य देशांनी कर वाढविल्याने खाद्य तेलालाही माहागाईची फोडणी बसली आहे.

अवघ्या वर्षभरात पेट्रोल २२ तर डिझेलमागे सरसरी २३ रुपयांची वाढ झाली आहे. या इंधनवाढीवरही महागाईचं गणित बहुतांशी अवलंबून आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा तर दुसरीकडे महागाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com