रमजान पर्वात फळबाजार तेजीत

रमजान पर्वात फळबाजार तेजीत

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरात रमजान (Ramadan) पर्वकाळ सुरू झाल्यापासून तेजीत असलेल्या फळबाजारात आता अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) पार्श्वभूमीवर फळाचा राजा आंबा (mango) देखील दाखल झाला असल्याने बाजार आखणीच बहरला आहे. उन्हाच्या तीव्रतेत शरीराला सुखद गारव्यासह गोडवा देणार्‍या फळांच्या (Fruits) खरेदीला नागरिकांकडून विशेष पसंती दिली जात असल्याने सध्या सर्व प्रकारच्या फळांच्या मागणीत वाढ झाली असून फळबाजारात लाखोंची उलाढाल होत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात फळांच्या मागणीत वाढ होते. यंदा कडक उन्हाळ्यात ( summer) रमजान पर्व सुरू झाल्याने आणि त्यातच दिवसागणिक तापमानाचा (Temperature) पारा उच्चांक गाठत असल्याने फळांच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. रोजेदार उपवास सोडतांना खजूराला विशेष महत्व देत असले तरी केळी, सफरचंद, चिक्कू, पपई, खरबूज, टरबूज, अननस, द्राक्ष, काकडी आदी फळांनाही मोठी मागणी आहे. त्यात गत काही दिवसांपासून फळांचा राजा आंबा देखील बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे फळबाजार (Fruit market) अक्षरश: दरवळून गेला आहे.

खरबूज, टरबूज, द्राक्ष, काकडी आदी फळे कसमादे परिसरातील ग्रामीण भागातून (rural area) विक्रीस येत आहेत तर सफरचंद, अननस, आंबा ही फळे मोठ्या बाजारपेठांमधून विक्रीसाठी मागविली जातात. केळी प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातून (algaon district) येत आहे. आंब्याची आवक सध्या कमीच असल्याने आज 120 ते 160 रूपये प्रतिकिलो भावाने विकले जात होते.

त्यामुळे फळांचा हा राजा आणखी काही दिवस तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहील, असे मानले जात आहे. अननस मुंबईच्या (mumbai) वाशी मार्केटमधून (Vashi Market) आणले जाते तर 1994 पासून केरळच्या (keral) कोच्चिन येथून रमजान पर्वात ते विक्रीसाठी येत आहे. अननस 40 ते 100 रूपये प्रतिनग दराने विकले जात आहे. टरबूज व केळी ही फळे सामान्यांना परवडणारी असल्याने त्यांची मात्र विक्रमी स्वरूपात विक्री होत आहे.

तीव्र उन्हाळा व रमजान पर्वामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाली असून शहरातील प्रमुख फळबाजारांशिवाय सरदार चौक, रामसेतू, मोसमपूल, एकत्मता चौक, सटाणानाका, रावळगाव नाका, कॅम्प सोमवार बाजार, नवे व जुने बसस्थानक, मच्छीबाजार, इस्लामपुरा, आयेशानगर, द्याने, आझादनगर, चंदनपुरी गेट, मुशावरत चौक आदी भागात रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याशिवाय शहरात 20 पेक्षा अधिक ठिकाणी विशेष बाजारही भरविला जात आहे.

मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व अंतीम टप्प्यात असून ईद व हिंदू बांधवांचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण एकाच दिवशी असल्याने आज शुक्रवारच्या आठवडे बाजारात खरेदीला उधाण आल्याचे दिसत होते. प्रामख्याने सकाळी 11 पर्यंत व सायंकाळी 4 नंतर शहरातील प्रमुख बाजारपेठा खरेदीदारांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. अक्षय तृतीयेला हिंदू बांधव अंबा पूजून आपल्या पुर्वजांना पुरणपोळी व आमरसाचा नैवैद्य दाखवतात, आगारी टाकल्यानंतरच आंबे खाण्यास सुरूवात करतात. या पार्श्वभूमीवर आज आंबे खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. आंब्याचे भाव ऐकून मात्र अनेकांचा हिरमोड होताना दिसत होता.

Related Stories

No stories found.